DR. RAM BHOSALE : The Visionary Pioneer of Samvahan Vibrational Massage Therapy and Holistic Healing Excellence

डॉ. राम भोसले : संवाहन व्हायब्रेशनल मसाज थेरपीचे अग्रणी आणि एक दूरदर्शी तज्ज्ञ उपचारक

Fri Mar 27, 2026

      खाली नमूद केलेल्या कविता आणि अनुभव ही फक्त एक झलक आहे. संपूर्ण अनुभव "श्री स्वामी समर्थ आशीष" या पुस्तकामध्ये नमूद केलेला असून, वर दिलेल्या "BUY NOW" बटणावर क्लिक करून आपण तो वाचू शकता. सदर पुस्तक इतर तीन पुस्तकांसह ईबुक संचामध्ये उपलब्ध आहे.

©Poonam$

“डॉ. राम भोसले म्हणजे सिद्धहस्त, दिव्यस्पर्शी व रूग्णांच्या व्याधी लीलया दूर करणारा अवलिया आणि संवाहन या स्पंदनथेरपीचे उस्ताद.”

डॉ. राम भोसले यांच्याशी झालेल्या अद्भुत भेटीस निमित्त ठरली ती म्हणजे त्यांनी उदयास आणलेली “संवाहन” नामक स्पर्शविद्या.

“हे शास्त्र म्हणजे आपल्या बोटांचा व हातांचा योग्यरीतीने वापर करून संगीताच्या लयबद्ध व प्रसन्नमय वातावरणात पीडितांच्या व्याधी हरायचे प्रभावी अस्त्र असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.”

संवाहन ही विद्या खरंच वर्णन करायच्या पलीकडची आहे. जे काही माझ्या अल्पबुद्धीला सुचत आहे ते मनोगत स्वरूपात मांडून माझी या विद्येबद्दलची व ही विद्या माझ्यापर्यंत प्राथमिक स्वरूपामध्ये पोहोचवणार्‍या प्रत्येक व्यक्तीबद्दलची कृतज्ञता आज व्यक्त करत आहे.

श्रीराम नवमी २०२२

तालबद्ध लयींच्या सरावाने उत्पन्न झालेल्या अनेक लहरी व स्पंदनांचा समूह म्हणजे संवाहन
रुग्णसेवेबद्दल झालेला आपला दिव्य शक्तीशी ठराव म्हणजे संवाहन

रुग्ण बरा करायची लागून राहिलेली तळमळ म्हणजे संवाहन
शुद्ध हेतु, रुग्णसेवेचं व्रत व गुरुकृपेने भारलेला प्रत्येक क्षण म्हणजे संवाहन

रघुवीर श्रीराम देवतेचे तत्व आकाश
सिद्धहस्त डॉ. राम भोसले यांच्या कार्याचा जगाच्या कानाकोपर्‍यात पसरावा प्रकाश

असे म्हटले जाते की सिद्ध व महात्मे निर्वाण प्राप्तीनंतरसुद्धा १०० पटीने अधिक कार्यरत असतात
आज संवाहनाच्या माध्यमातून जाणवली रामबाबांची दिव्य प्रचिती साधकाच्या घरात

आज तिथीस जन्म दोन्ही श्रीरामांचा
एक अयोध्यापती, तर दुसरे रुग्ण बरे करण्याचे अधिपती

आज लाभला श्रीराम नवमीच्या शुभ पर्वावर “रामबाबांच्या” भेटीचा अभूतपूर्व अनुबंध
काहीतरी नक्कीच असावा या विद्येशी गतजन्माचा ऋणानुबंध

श्रीराम नवमी २०२३

डॉ. राम भोसले — नाम तो सुना ही होगा
हा वही हस्ती जिनके हाथों के बलबुते होता था ७२००० नाड़ियों का नर्तन
एक दिव्य “न भूतो न भविष्यति” अवलिया, जिस से उभरा स्पंदनयुक्त पीडाहारक मर्दन

संवाहन नामक स्पर्शविद्या का करके आविष्कार
पीड़ितों के लिए खोल दिया रोगमुक्ति का द्वार

अखंडित रुग्णसेवा का व्रत, बेजोड़ मेहनत की तालीम
रोग की तीव्रता को कर देते थे बेअसर, चाहे हो वह कितनी भी जालिम

यह भारतीय बच्चा जा पहुँचा विदेश की भूमि मिटाने अपनी ज्ञान की प्यास
इस कर्मयोगी ने आजीवन लिया था “Work is Worship” का ध्यास

गुरु आज्ञा का काज संभालते-संभालते ना जाने कब बन गए यह खुद एक सरताज
आज जन्मदिन है ऐसे नायाब कोहिनूर का, जिस पर हमें है पूरा-पूरा नाज़

      खरं सांगायचं तर डॉ. राम भोसले हे जगद्विख्यात हिलर, स्पंदन मसाज तंत्राचे माहिर, कर्मयोगी, एक बहुरंगी व्यक्तिमत्व आणि अनेक-विध शास्त्रांचे जाणकार. “सिद्धहस्त” आणि “दिव्यस्पर्शी” या दोन पुस्तकांमार्फत आपल्याला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता येऊ शकते. प्रत्येकाने त्यांचे पुस्तक वाचावे, त्यांचा अफाट जीवन प्रवास जाणून घ्यावा, त्यातून बरेच काही शिकून घ्यावे आणि आपल्याला भावलेल्या काही गोष्टीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

© Poonam$

      माझ्या हिलिंग क्षेत्रातील प्रवासादरम्यान आपण मला भेटलात व काही अनुभूतींचे व आपल्या आशीर्वादाचे दान माझ्या पदरात घातले, हे माझे परम भाग्य. एक हिलर म्हणून सुरू असलेल्या माझ्या प्रवासात, जेव्हा मलाही निराशा व इतर काही कारणांनी दीर्घकाळ मूर्च्छित झाल्यासारखे वाटत होते, त्यावेळी हाती आलेल्या “सिद्धहस्त” ह्या पुस्तकाने माझ्यासाठी संजीवनीची भूमिका बजावली. पुस्तक वाचताना डोळे अनेकदा अश्रूंनी भरलेले होते. “सिद्धहस्त” या पुस्तकातून मिळालेल्या प्रेरणेने मनाला नवी उभारी मिळाली.

श्रीराम नवमी २०२६

      डॉ. राम भोसले हे स्पंदन मसाज तंत्र म्हणजेच स्पर्शोपचाराच्या क्षेत्रातील एक विलक्षण आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेले तज्ञ होते, ज्यांनी “संवाहन विद्या” या प्राचीन भारतीय उपचार परंपरेला नवचैतन्य देत तिला एक सखोल अध्यात्मिक आणि वैज्ञानिक आयाम प्रदान केला. त्यांच्या दृष्टीने संवाहन ही केवळ मसाज पद्धती नव्हती, तर शरीर, मन आणि चेतना यांचा सूक्ष्म समतोल साधणारी एक ऊर्जा-आधारित साधना होती, ज्यात स्पर्श हा उपचाराचा माध्यम बनतो आणि प्राणशक्तीचा प्रवाह जागृत होतो. त्यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना दीर्घकालीन वेदना, ताण आणि मानसिक अस्वस्थतेतून लक्षणीय आराम मिळाल्याचे अनुभव व संशोधनात्मक नोंदी प्रत्यक्ष दिसून आल्या आहेत.

      बालपणीच कठीण परिस्थितींना सामोरे जात असतानाही डॉ. राम भोसले यांनी आपल्या अंतर्गत शक्तीवर विश्वास ठेवत पुढे जाऊन नृत्य, संगीत आणि अध्यात्म यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यातूनच त्यांनी स्पर्शोपचाराची एक अद्वितीय दिशा विकसित केली. त्यांनी पारंपरिक भारतीय ज्ञान आणि स्वतःच्या अनुभूतींचा सुंदर संगम साधत संवाहन विद्येला केवळ उपचार तंत्र न ठेवता एक जागृत साधना म्हणून उंचावले, जिथे उपचारकाची सजगता, शुद्धता, साधना आणि अंतर्गत शांतता ही उपचाराच्या प्रभावाचे केंद्रबिंदू ठरतात. त्यांच्या मते खरा उपचार हा तंत्रातून नव्हे, तर प्रेम, करुणा आणि उपस्थितीच्या गाभ्यातून घडतो.

      डॉ. राम भोसले यांनी भारतासह युरोप आणि इतर अनेक देशांमध्ये अनेक रुग्ण पीडामुक्त केले. तसेच हजारो लोकांना या उपचार पद्धतीची ओळख करून दिली आणि त्यांना स्वउपचार तसेच इतरांच्या सेवेसाठी प्रेरित केले. त्यांच्या कार्यामुळे संवाहन विद्या केवळ एक उपचार पद्धती न राहता एक जागतिक चळवळ बनली, जी आजही त्यांच्या शिष्यांद्वारे पुढे नेली जात आहे. त्यांच्या शिकवणीतून स्पष्ट होते की शरीराच्या पलीकडे जाऊन चेतनेच्या स्तरावर परिवर्तन घडवून आणणे हेच खरे उपचार आहे.

      त्यांचे संपूर्ण जीवन हे निःस्वार्थ सेवा, साधेपणा आणि प्रेम यांचे सजीव रूप होते, जिथे प्रत्येक व्यक्तीकडे त्यांनी अपार संवेदनशीलतेने आणि आदराने पाहिले. त्यांच्या स्पर्शात उपचाराची गूढ शक्ती होती आणि त्यांच्या विचारांमध्ये मानवतेसाठी करुणेचा अमर संदेश होता. आजही डॉ. राम भोसले यांचे कार्य आणि तत्त्वज्ञान उपचार क्षेत्रात दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करते आणि असंख्य साधकांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत ठरत आहे.

“सिद्धहस्त” या पुस्तक वाचनानंतर सारांश स्वरूपात लिहलेली कविता खाली प्रस्तुत करत आहे.

संवाहनविद्यारूपी नवसंजीवनीचे महर्षी : डॉ. राम भोसले

नवसंजीवनी प्रदान करणारे दोन दैवी औषधमयी हात
अध्यात्म अभ्यासून स्पंदन मसाज तंत्रात झालात तुम्ही माहिर खास

देशविदेशातील असंख्य रुग्णांच्या वेदनांचे केले निवारण
आज श्रीरामनवमीचे औचित्य साधून तुमच्या जन्मदिवशी करत आहोत अनन्यसाधारण अशा महामानवाचे पुनः पुण्यस्मरण

बागकाम ते वार्डबॉय व सर हर्बर्ट बार्कर यांचा सहाय्यक ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मसाज महर्षी
मसाज व अस्थिसंघन या कार्यात मिळवली अगम्य निपुणता, जी वाटे केवळ दैवी

आपल्या कलागुणांनी व अथक प्रयत्नांनी अनेकांना आरोग्यसंपन्न करण्याचा घेतला तुम्ही वसा
उमटवला आपल्या अफाट कर्तृत्वाने जगभरातील स्पंदन मसाज थेरपी क्षेत्रात कधीही न पुसला जाणारा ठसा

निर्जीव पेशींना करत सहज सक्रिय, निर्माण केला ऊर्जायुक्त बोटांनी रुग्णांच्या शरीरात तरंग व संतुलित दबाव
मग कुठे राहतोय रुग्णांच्या शरीरात कुठल्याही रोगाला व पीडेला वाव

आपल्या जिद्दी, महत्त्वाकांक्षी स्वभावाने केली अनेकदा दयनीय परिस्थितींवर मात
कठीण प्रसंगांतूनही साधली तुम्ही यशाची नवी वाट

नित्यानंद बाबांशी (गणेशपुरी) जेव्हा झाली तुमची प्रथम भेट, नव्हते त्यांच्याबद्दल कोणतेही ज्ञान अवगत
"अतिथी देवो भव" म्हणत श्रीगुरुंनीच केले तुमचे स्वागत

मनासारखे भोजन झाले चांदीच्या ताटामध्ये हजर
मनसोक्त भोजनानंतर श्रीगुरुंच्याच मांडीवर डोके ठेवून अनुभवला गाढ झोपेचा अनोखा अवसर

आत्महत्या करायला गेलेल्या बालकाच्या आयुष्याला मिळत खऱ्या अर्थाने कलाटणी, झाला घनदाट तिमिरामध्ये नवा अरुणोदय
पटली खात्री मनोमनी , याच गुरूंच्या पदस्पर्शाने होणार आपला भाग्योदय

१६० वेळा विदेश वारी, होशील निष्णात जगप्रसिद्ध डॉक्टर
श्रीगुरुवाणी व आशीर्वादाने लावली तुमच्या उज्ज्वल भविष्यावर मोहर

©Poonam$

बागकाम करत असताना बोलून दाखवली सर्जन होण्याची इच्छा
"इच्छा तिथे मार्ग" म्हणत केली प्रयत्नांची अखंड साधना व पुरवला अनेक ध्येयांची पूर्ती होईपर्यंत पुरेपूर पिच्छा

संवाहन म्हणजे मृत पेशी व स्नायूंना पुनः करणे जीवित
ताल व स्पंदन यांचा परस्पर संबंध साधत, जोडीला घेतले नृत्य व संगीत

"हा डॉक्टर बोटांनी ऐकतो", अशी रुग्णांमध्ये होतसे चर्चा
शरीरशास्त्र, मज्जासंस्था, विकार, वेदना, विश्रांती यांचा समन्वय साधत सुधारला असंख्य रुग्णांच्या आरोग्याचा दर्जा

भारतीय संगीत, नाडीशास्त्र व वैश्विक शक्ती यांचा करून संयोग
विकसित केली संवाहन विद्या , बरे करायला हरेक पीडा आणि रोग

जेव्हा सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी अनुभवला डॉक्टरांकडून विशेष मसाज
दिली तात्काळ प्रतिक्रिया , खरंच पेनिसिलीनखेरीज इतरही प्रभावी उपचार उपलब्ध आहेत जगात

सर हर्बर्ट बार्कर यांनी काही वर्षांच्या भेटीनंतर डॉक्टरांच्या दैदीप्यमान कार्याची कीर्ती ऐकून म्हटले,
"सार्थ अभिमान राम तुझा, तूच माझी गादी चालवणार"
मन हेलावून गेले डॉक्टरांचे, जेव्हा गुरू मुखातून बाहेर पडले हे उद्गार

डॉक्टर राम भोसले म्हणजे  "गुरुसे चेला सवाई"
अनेक दुर्धर आजारांची संवाहन विद्येने, अनेक मसाज व उपचार पद्धतींनी ज्याने केली लीलया विदाई.


        डॉ. राम भोसले यांच्या असाधारण आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाविषयी आपल्याला "सिद्धहस्त" व "दिव्यस्पर्शी" या पुस्तकातून अधिक जाणून घेता येऊ शकते. जो प्रवास वाचताना केवळ अशक्य वाटतो. असंख्य संघर्षांना पुरून उरणारे, ज्ञानपिपासू व आपल्या ज्ञानाच्या व कार्याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना बरे करणारे आणि आपल्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आजही अनेकांना प्रेरित करणारे डॉ. राम भोसले यांच्या प्रवासाबाबत माझ्या सध्याच्या मास्टरचे एकच वाक्य मुखी येते ते म्हणजे , “Healing is not for the faint-hearted.” “You need to be very brave to walk on this path.”      

माझ्या आजपर्यंतच्या सर्व हिलिंग मास्टर्सना खालील कविता समर्पित करत आहे:

Dear all masters, you heal others with divine hands and heart
What comes from the heart reaches the heart; accept our sincere gratitude that will never depart 

In deep gratitude, we lift your name
For lives you touch & for the hope you claim 

With wisdom, passion, knowledge and might
You remove the darkness and renew the light 

You are responsible for removing the blocks and dark cloud
Through this poem we celebrate you & your work, we are so proud (of you).

©Poonam$
      तुम्ही करत असलेल्या कार्याला व तुमच्या ज्ञानपिपासू वृत्तीला सलाम. ते अर्जित केलेलं ज्ञान इतरांना मुक्तहस्ताने देऊन अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याच्या वृत्तीलाही सलाम. तुमच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल अनेक आभार. असे अतुलनीय व असामान्य मास्टर्स या हिलिंगच्या प्रवासात मला लाभले, त्याबद्दल स्वामींचेही अनेक आभार. 

      एक सुप्रसिद्ध जपानी म्हण येथे आवर्जून नमूद करावीशी वाटते, Better than a thousand days of diligent study is one day with a great teacher.  

II श्री स्वामी समर्थ II जय शंकर II

Do not copy
English version of book will be available in due course.